हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय ; अजितदादांनी फडणवीसांना फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.

काल फडणवीस यांनी त्यांच्या सभेत अजित पवार यांची नक्कल केली होती. त्याचा देखील अजित दादांनी समाचार घेतला. आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर… असे म्हणत सूचक इशाराच अजित पवार यांनी फडणवीसांना दिला.

दरम्यान फडणवीस यांनी शरद पवार यांच्या पावसात भिजण्यावर केलेल्या वक्तव्याचाही अजित पवार यांनी समाचार घेतला. तुम्ही कोठे आणि साहेब कोठे असे म्हणत अजित पवार यांनी फडणवीस यांना टोला हाणला. चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. चंद्रकांत पाटील यांचा ‘चंपा’ असा पुन्हा एकदा उल्लेख करत ‘ते उद्या येथे येऊन काहीही सांगतील पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका’, असे अजित पवार म्हणाले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment