संतापजनक! पती पत्नीचे महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य; व्हिडीओ शूट करून व्हायरल करण्याची दिली धमकी

0
45
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी । एका महिलेवर अनैसर्गिक अत्याचार केले गेल्याची धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे. शहरात राहणाऱ्या एका दांपत्त्याकडूनच हा लज्जास्पद प्रकार घडला असल्याने एकाच खळबळ उडाली आहे. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रतापनगर भागात सदर घटना घडली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे. रामकिशन जांगिड (वय ४४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सरोज रामकिशन जांगिड (वय ४०, दोन्ही रा. शांतीविहार रेसिडेन्सी, दाते ले-आउट, सोनेगाव),असे रामकिशन याच्या पत्नीचे नाव आहे. पीडित ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

रामकिशन हा फर्निचर कंत्राटदार आहे. पीडित महिला रुग्ण सांभाळण्याचे काम करते. २०११ मध्ये रामकिशन व त्याची पत्नी पीडित महिलेच्या नातेवाइकाकडे भाड्याने राहायला आले. यादरम्यान पीडित महिला व सरोजची ओळख झाली. पीडित महिलेचे सरोजच्या घरी जाणे-येणे वाढले. माझे पती माझ्यावर प्रेम करीत नाहीत, असे सरोजने पीडित महिलेला सांगितले. त्यानंतर तिने पीडित महिलेसोबत बळजबरीने अश्लील चाळे केले. याची चित्रफितही सरोजने काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन सरोज ही पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करायला लागली. त्यानंतर सरोजने पतीला याबाबत सांगितले. तिच्या पतीनेही चित्रफित व्हायरल करेन अशी धमकी देऊन पीडित महिलेसोबत अनैसर्गिक कृत्य करायला सुरुवात केली. या अश्लील कृत्याची मोबाइलद्वारे चित्रफित तयार केली. ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन दाम्पत्य तिला ब्लॅकमेल करायला लागले.

रामकिशनने नंतर पीडित महिलला लग्नाचे आमिष दाखविले. तिला राजस्थान येथे नेले. तेथेही तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. पीडित महिलेने रामकिशन याला लग्नाची गळ घातली. त्यानंतर जांगिड दाम्पत्य दाते ले-आऊट येथे राहायला गेले. रामकिशन याने पीडित महिलेला लग्नास नकार दिला. या सगळ्या प्रकाराबाबत पीडित महिलेने प्रतापगर पोलिसांत तक्रार दिली असून नागपूर पोलिसांनी अनैसर्गिक कृत्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून रामकिशन याला अटक केली आहे.

हे पण वाचा –

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

धक्कादायक! वाहनामध्ये लैंगिक अत्याचार करून तरुणीला नग्न अवस्थेत रस्त्यावर सोडले

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

गर्लफ्रेंडला भेटायला उस्मानाबादचा तरुण मोटारसायकलवरुन थेट पाकिस्तानला; BSF ने अडवले

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here