गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टाचा दणका!! सुनावली पोलीस कोठडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते याना चितावणीखोर भाषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आज किला कोर्टात त्याबाबत गुणारत्ने सदावर्ते यांच्यासह 109 जणांवर सुनावणी पार पडल्यानंतर कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

किला कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय देत 11 एप्रिल पर्यंत म्हणजेच 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सदावर्ते यांचे वकील महेश वासनिस यांनी ही कारवाई रोषातून झाली आहे असा आरोप यावेळी केला आहे

एसटी कामगारांनी शरद पवार यांच्या घराबाहेर दगडफेक केल्यानंतर वकील गुणारत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर कलम १०७, १२० ब (कट रचणे), १३२, १४२, १४३, १४५, १४७, १४८, ३३२, ३३३, ३५३, यासह चिथावल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बेकायदा जमाव जमविणे, सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांना दुखापत करण्याच्या उद्देश्याने कृत्य आणि हल्ल्याचा कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

Leave a Comment