संतापजनक ! अल्पवयीन आते बहिणीवर मामेभावाने केला अत्याचार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा : हॅलो महाराष्ट्र – वर्ध्यामध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एक गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मामेभावाने अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी समुद्रपूर तालुक्यातील गिरड पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या एका गावात 55 वर्षाच्या नराधमाने 3 अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर पुन्हा अशीच घटना घडल्याने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे.

काय आहे प्रकरण ?
या प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीचा मामेभाऊ हा तिच्याच घरी राहत होता. घरातीलच असल्याने मामेभावाने कधी मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे मुलीच्या घरच्यांनासुद्धा समजले नाही. यानंतर काही दिवसांनी अचानक मुलीची तब्येत बिघडल्याने तिला शहरातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी आणले. तेव्हा हि पीडित मुलगी तीन महिन्यांची गरोदर होती.

यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी हिंगणघाट पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणी चौकशी करीत आरोपी विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोस्को सेलच्या साय्यक पोलिस निरीक्षक धनश्री कुटेमाटे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.