कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली; गेल्या २४ तासांत ४५,८९२ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं असून कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे तसेच अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४५,८९२ नवीन करोना बाधित आढळून आले आहेत आणि ८१७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. काल दिवसभरात ४४,२९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 7 लाख 9 हजार 557 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 98 लाख 43 हजार 825 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 5 हजार 28 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 60 हजार 704 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

Leave a Comment