कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; ‘या’ देशात आढळला कोरोनाचा भयंकर व्हेरिएंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांनी देखील या व्हायरस मुळे चिंता व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेत  मल्टिपल म्युटेशन क्षमता असलेला कोरोनाचा एक नवा व्हेरिएंट आढळला आहे. हा व्हेरिएंट शास्त्री.  लीनिएज B.1.1.1.529 या नावाने ओळखला जातो. या नव्या कोरोना व्हेरिएंटमध्ये सर्वाधिक म्युटेशन आहे. हा कोरोना व्हेरिएंट बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेतून गेलेल्या अनेक प्रवाशांच्या कोरोना चाचणीत आढळला आहे.

या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दरम्यान या महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला 100 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत असे. मात्र आता कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून दिवसाला 1200 रुग्णांची नोंद होत आहे.

दरम्यान, देशातली राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संयुक्त बैठकीत बोलताना आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, भारताच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने सरकारला ह्या विषाणूबद्दलची माहिती दिली आहे. हा विषाणूने वेगाने प्रसार होणारा असून यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी या भागातून येणाऱ्या प्रवाशांची काटेकोरपणे आणि आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करुन तपासणी करावी तसंच त्यांची नोंद ठेवावी.

Leave a Comment