नवी दिल्ली । संपूर्ण जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं आहे. कोरोनाचा भारतातील प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. भारतात आतापर्यंत ३१ लाख ६७ हजार ३२४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६० हजार ९७५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८४८ जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतात आतापर्यंत ५८ हजार ३९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत देशात २४ लाख ४ हजार ५८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सात लाख ४ हजार ३४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार २४ ऑगस्ट २०२० पर्यंत देशात तीन कोटी ६८ लाख २७ हजार ५२० करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
सोमवारी देशात ९ लाख २५ हार ३८३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी जवळपास ६१ हजार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.देशात कोरोना चाचणीची संख्या वाढल्यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यात करोनाबाधितांची संख्या आधिक वाढत आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर ७५ टक्केंपेक्षा अधिक झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”