रैनाला आली सुशांतची आठवण ; शेअर केला हा ‘भावुक’ व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान इंडियन प्रीमियर लीग युएईमध्ये खेळली जाईल. आयपीएलच्या 13 व्या सत्रातील सर्व संघ युएईमध्ये पोहोचले आहेत. यावेळी खेळाडू एकट्याने व्यायाम करत आहेत, संगीताचा आनंद घेत आहेत किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधत आहेत. याचदरम्यान, भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनाला दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची आठवण आली.

अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडू सुरेश रैनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर सुशांत सिंग राजपूत यांचे चित्र आहे. त्याचवेळी सुशांतच्या ‘केदारनाथ’ चित्रपटाचे ‘जान निसार’ हे गाणे पार्श्वभूमीवर वाजत आहे. हा व्हिडिओ खूप भावनिक आहे.

View this post on Instagram

A post shared by Suresh Raina (@sureshraina3)

हा भावनिक व्हिडिओ सामायिक करताना सुरेश रैनाने कॅप्शनमध्ये लिहिले- भाऊ … तू आमच्या अंत: करणात सदैव जिवंत राहशील. तुझे चाहते कोणत्याही गोष्टी पेक्षा तुला जास्त मिस करत आहेत. सरकार आणि नेत्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते तुला न्याय मिळवून देण्यासाठी कसलीही कसर सोडणार नाहीत. तूच एक प्रेरणा आहेस. #GlobalPrayersforSSR #JusticeforSSR हा व्हिडिओ शेअर करताना सुरेश रैनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले आहे.

यापूर्वी 19 ऑगस्ट रोजीसुद्धा सुरेश रैनाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सुशांतसिंग राजपूतसोबत स्वत:चा एक फोटो शेअर केला होता.सुशांतसिंग राजपूत प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. हे प्रकरण आता सीबीआयकडे आहे आणि सीबीआय टीम या प्रकरणाचा तपास करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’