नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीचा उद्रेक अजून कायम असून कोरोना विषाणूचा फैलावाचं प्रमाण कमी होताना दिसत नाही आहे. देशभरातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने ५६ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४७ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, १ हजार ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५६ लाख ४६ हजार ११ वर पोहचली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, देशभरातील एकूण ५६ लाख ४६ हजार ११ कोरोनाबाधितांमध्ये ९ लाख ६८ हजार ३७७ अॅक्टिव्ह रुग्ण, डिस्चार्ज मिळालेले ४५ लाख ८७ हजार ६१४ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ९० हजार २० जणांचा समावेश आहे.
येत्या २२ सप्टेंबरपर्यंत देशभरात ६,६२,७९,४६२ नमूने तपासणी झाली तर, ९ लाख ५३ हजार ६८३ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.