भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला; एका दिवसात ५५ हजार कोरोनाग्रस्त वाढले

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना रुग्ण वाढीचा वेग कायम असून मागील २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ५५०७९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. कालही देशात कोरोनाचे ५० हजाराहून अधिक रुग्ण सापडले होते. त्यामुळे कोरोनाच्या या वेगाने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भारताने १६ लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला. आतापर्यंत भारतामधील १६,३८,८७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ५,४५,३१८ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर १०,५७,८०६ लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे.

गुरुवारी देशभरात एकूण ६,४२,५८८ कोरोना चाचण्या झाल्या. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये घाबरून जाऊ नका, असे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावाचा हा वेग नागरिकांना नक्कीच चिंतेत टाकत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here