कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ‘या’ राज्याने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रांची । झारखंड राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तेथील राज्य सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ट्विटवर दिली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन पूर्वीसारखेच काटेकोरपणे चालू राहील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याआधी लॉकडाऊन कालावधी फक्त ३० जूनचा होता.

राज्य सरकारने शुक्रवारी एक अधिसूचना जारी केली आणि म्हटले आहे की, उच्चस्तरीय बैठकीनंतर कोविद -१९ रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्य सचिव सुखदेव सिंह यांनी आज हे निर्देश जारी केले.

पूर्वीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे, मॉल्स, सलून, स्पा, हॉटेल, रेस्टॉरंट्स, धर्मशाळा, बार, आंतरराज्यीय बससेवा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, जिम, कोचिंग यासह मंदिर, मशिदी, चर्च यांचा समावेश आहे. संस्था बंदच राहतील आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन काटेकोरपणे सुरु राहील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment