पुणे । कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी पुण्यात पुन्हा एकदा १० दिवसांसाठी कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करता यावी यासाठी उद्या रविवारी एक दिवस लॉकडाउन थोडा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कठोर लॉकडाउनची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्यात १४ जुलैपासून सर्व दुकाने बंद आहेत.
उद्या लॉकडाऊन शिथिल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. फक्त १ दिवसासाठी ही सवलत देण्यात येणार आहे. सुरक्षित अंतर राखून नियमांचे पालन करुन नागरिकांनी खरेदी करावी असे आदेशामध्ये म्हटले आहे. उद्या जीवनावश्यक वस्तुंची, किरकोळ, मटन, चिकन, मासे, अंडी विक्रीची सर्व दुकाने सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत चालू राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात सुद्धा एक दिवस लॉकडाउन शिथिल
पिंपरी-चिंचवड शहरात १० दिवसांचे लॉगडाऊन लागू करण्यात आले असून उद्या १९ जुलै साठी लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असून केवळ उद्या सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सुरू राहतील, परंतु, त्यानंतर २० जुलै ते २३ पर्यंत आधी लागू केलेल्या नियमांनुसार सकाळी ८ ते १२ पर्यंत सुरू होणार आहेत. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी महानगर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”