सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात वन्य प्राण्यांकडून जनावरांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. जावली तालुक्यातील कुसुंबीमुरा या दुर्गम भागात शेतात जनावरे चारण्यासाठी सोडलेली होती. या जनावरांच्यातील पांडुरंग कोकरे यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. कास पठार भागात हे गाव असून सध्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनास्थळी जावळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून माहिती घेत आहेत. जावळी भागात बिबट्याचा वावर वाढल्याने त्याचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी करत आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. तर वनविभागही तंटपुंजी मदत देत असून ती वेळवर मिळत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
कास पठार आणि जावळी भागात डोंगर रांगा असल्याने याठिकाणी हिस्त्र प्राण्याचा वावर वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने बिबट्या मानवी वस्तीत येवून जनावरांवर हल्ला करीत आहे. तेव्हा वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होवू लागली आहे.