काय सांगता! कारखान्याचा काटा लॉक : पट्ट्याने आणला तब्बल 47.451 टन ऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
किसन वीर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यातील शेतकरी सभासद ऊस गाळपासाठी आणत आहेत. कारखान्यामध्ये ऊसः वाहतुक करणाऱ्या वाहनांचे वजन साधारणतः 22 ते 25 मेट्रिक टनापर्यंत असते. परंतु अक्षय कृष्णदेव पवार या ट्रॅक्टर मालकाने 47.541 मेट्रिक टन निव्वळ ऊस आणल्याने किसन वीर कारखान्याचा काटा लॉक झाला. या वाहन मालकाने आणलेल्या ऊसाचे काैतुक म्हणून कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी अक्षय पवार व वाहन चालक संदिप दिलीप साबळे यांचा शॉल, श्रीफळ, पेढे देऊन यथोचित सत्कार केला.

हायटेक शेती करून असा कमवा दुप्पट नफा

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती यावर दिली जाते. तसेच सातबारा, जमिनीचा नकाशा सोप्या पद्धतीने डाउनलोड करता येतो. रोजचा बाजारभाव इथे समजतो. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते.

Click Here To Download Hello Krushi App

किसन वीर व खंडाळा कारखाना आर्थिक गर्तेत सापडल्याने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद हतबल झालेला दिसून येत होता. पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच मे 2022 मध्ये कारखान्याच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याची सुत्रे वाई- खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांच्याकडे आली. शेतकऱ्यांनी टाकलेल्या विश्वासावर किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने वेळेत सुरू करून ऊस उत्पादकांच्या खात्यावर पहिला अॅडव्हान्स जमाही झाला. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येऊ लागला. कारखान्याचे गाळपही व्यवस्थितपणे सुरू आहे.

शुक्रवार (दि.2) रोजी सुरज रामदास येवले पांडेवाडी (ता.वाई) या शेतकऱ्याच्या शेतातील ऊस अक्षय कृष्णदेव पवार यांच्या वाहनातून आणण्यात आला. या वाहनाचे भर वजन 56.180 मेट्रिक टन असून निव्वळ ऊसाचे वजन 47.541 मेट्रिक टन भरल्याने काट्यावर वजनच करता आले नाही व काटा लॉक झाला. अक्षय पवार यांच्या सत्कारप्रसंगी कारखान्याचे संचालक प्रकाश धुरगुडे, मुख्य शेती अधिकारी विठ्ठलराव कदम, खंडाळा कारखाना शेती अधिकारी अशोक घाडगे, केनयार्ड सुपरवायझर हणमंत निकम, अरविंद नवले, संदीपशेठ बाबर, अजय भोसले, विजय शिंगटे, सुजितसिंह जाधवराव, सचिन निकम, मामा पाटील, गिरीश कडाळे, ज्ञानेश्वर महामुनी आदी उपस्थित होते.

शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कृषी क्षेत्राशी निगडित कृषीविषयक शासकीय योजना, पिकाची विक्री, ऊस बियाणे, ऊस दर, लागवड याबाबत माहिती मिळवायची असेल तर Hello Krushi हे ॲप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा. त्यातून तुम्हाला माहिती मिळेल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. त्यामध्ये तुम्हाला शेतीशी निगडित अनेक व्यवसाय, त्यासाठी शासनाकडून देण्यात येत असलेल्या योजनाची माहिती मिळेल. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here