हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी छत्तीसगड (Chattisgadh) येथील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर भ्याड हल्ला (Naxal Attack) केला आहे. या वाहनांना दुपारी आयईडीने लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यात तब्बल 9 भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले आहेत. तर 6 पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती बस्तरच्या पोलिस अधिक्षकांनी वृत्तपत्रांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी भारतीय लष्कराच्या जवानांना केंद्रित करत नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता. भारतीय जवानांची वाहने कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ येताच नक्षलवाद्यांनी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट केला. या स्फोटात ८ दंतेवाडा डीआरजी जवान यासह एका ड्रायव्हरला आपला जीव गमवावा लागला आहे.
Chhattisgarh | An IED blast occurred on security force's vehicle in Bijapur district. More details awaited: IG Bastar pic.twitter.com/JVKvuHCvyY
— ANI (@ANI) January 6, 2025
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी हलवण्यात आले. सांगितले जात आहे की , या हल्ल्यापूर्वी भारतीय जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत होते. परंतु मध्येच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हा हल्ला केला.