मध्य प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू तर 87 लोक जखमी

Madhya Pradesh Factory Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) हरदा येथे एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट (Cracker factories) झाल्यामुळे 60 पेक्षा अधिक घरांना आग लागली आहे. तसेच 87 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. याबरोबर 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सध्या जखमी झालेल्यांना उपचारासाठी हरदा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचे आणि गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास हरदामधील फटाक्याच्या कारखान्यात अचानकपणे आग लागली. यानंतर स्फोट होण्यास सुरूवात झाली. या स्फोटाचे तीन किलोमीटर अंतरापर्यंत हादरे जाणवत होते. या घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर त्यांनी बचाव कार्याला सुरुवात करत परिसरातील लोकांना सुरक्षा स्थळी पोहोचवले. तसेच, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच ही आग नियंत्रणात आली.

मुख्य म्हणजे, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, या घटनेमध्ये किती प्रमाणात मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आतापर्यंत बचाव पथकाने 20 पेक्षा अधिक लोकांना वाचवले आहेत. यातील बरेच लोक जखमी अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर प्रशासनाने आगीचे कारण शोधून आरोपींवर कठोर कारवाई करावी असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सकाळी काही मिनिटांमध्येच या आगीने संपुर्ण कारखान्याला वेढले होते. कारखान्याला आग लागण्याचे पाहता परिसरात गोंधळ उडाला होता. यानंतर स्थानिकांनी त्वरित अग्निशामक दलाला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले. कारखान्याला आग लागल्यामुळे अनेक लोक आतमध्येच अडकले होते. त्यामुळे सर्वात प्रथम जवानांनी लोकांना बाहेर काढले. मात्र या सगळ्याच ही आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.