औरंगाबाद: कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होत असताना आता म्युकरमायकोसिसचा धोका औरंगाबाद शहरात वाढत आहे. यामुळे औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्यात आला आहे.
या वॉर्डमध्ये म्युकरमायकोसिसच्या रुग्णाचे उपचार अगदी मोफत होणार असून, महागडे इनजेक्शन तसेच सर्व औषध सुद्धा मोफत मिळणार आहे. या वार्डमध्ये 90 म्युकॉर्मयकॉसिसग्रस्त रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.
दरम्यान, औरंगाबाद येथे आतापर्यंत सुमारे एक हजार म्युकरमायकोसिसग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण शंभर जण या रुग्णाने दगावल्याले आहेत. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल वार्डाची पाहणी केली असून ही माहिती दिली.