हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Credit Card वापरण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे. यासाठी आपला क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा मानला जातो. क्रेडिट स्कोअर आर्थिक बाबींमध्ये महत्वाचे मानले जाते. बँकांकडून कर्ज कसे घेतले आणि ते कसे फेडले ते सांगते. पेमेंट वेळेवर केले जाते की नाही हे CIBIL स्कोअर किंवा क्रेडिट रेटिंग ठरवते.
जर आपण एखादे कर्ज घेतले असेल तर आपल्या कर्जाचा EMI आणि क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर परत केली पाहिजे. याद्वारे आपला क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होईल. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये.
याचप्रमाणे आपल्या Credit Card ची संपूर्ण मर्यादा वापरणे टाळले पाहिजे. याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो. जेव्हा क्रेडिट लिमिट पूर्णपणे वापरली जाते तेव्हा क्रेडिट युटिलायझेशन रेशो (CUR) वाढतोते. ज्यामुळे Credit card धारकाचा क्रेडिट स्कोअर खराब होतो. यामुळे भविष्यात कर्ज मिळणे अवघड होईल. हे लक्षात घ्या कि, क्रेडिट स्कोअरिंग एजन्सी द्वारे क्रेडिट युटिलायझेशन रेशो ठरवला जातो. तसेच आपण क्रेडिट कार्ड किती वापरतो यावर क्रेडिट युटिलायझेशन रेशो अवलंबून असतो.
याबोरबच आपला क्रेडिट स्कोअर नियमित तपासत राहा. कारण जर याद्वारे क्रेडिट स्कोअरमध्ये वेळेत सुधारणा करता येईल. क्रेडिट स्कोअर हे एक प्रकारचे रेटिंग आहे ज्याद्वारे आपण कर्ज फेडण्यात किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात किती गंभीर आहात हे कळून येते. जर आपण क्रेडिट कार्डचे बिल अथवा इतर कर्जे वेळेवर भरली नाहीत तर याचा परिणाम थेट आपल्या स्कोअरवर परिणाम होतो. Credit Card
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.cibil.com/freecibilscore
हे पण वाचा :
Earn Money : नोकर कपातीच्या काळात केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेद्वारे दरमहा मिळवा 9,000 रुपये
Bank FD : देशातील ‘या’ बँकानी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ, तपासा नवीन दर
Railway : रेल्वे स्थानकांवर आता अवघ्या काही मिनिटांत मिळणार तिकीट, रेल्वेने सुरू केली नवीन सुविधा
Torn Notes : जुन्या किंवा फाटलेल्या नोटांबाबत RBI चे नियम जाणून घ्या
FD Rates : देशातील ‘या’ सर्वात मोठ्या खाजगी बँकेच्या एफडीवरील व्याजदरात वाढ, तपासा नवीन व्याजदर