क्रेडिट कार्ड vs क्रेडिट लाइन: मिलेनियमसाठी कोणता चांगला पर्याय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । आजकाल चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तींसाठी बँक आणि इतर वित्तीय संस्थांकडून पैसे मिळवणे सोपे आहे. तथापि ज्यांच्याकडे क्रेडिट लिमिटेड एक्सेस आहे त्यांच्यासाठी हे सत्य नाही. परंतु नवीन-युगातील फिनटेक कंपन्यांचे आभार मानले पाहिजे जेथे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट मिळविणे शक्य आणि सोपे आहे.

फिनटेक कंपन्या क्रेडिट स्कोअरच्या पलीकडे जातात आणि क्रेडिट लाइन्स ऑफर करतात
लोकांकडे पारंपरिक पर्याय म्हणून क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि र्सनल लोन (Personal Loans) आहेत. त्याच वेळी, फिनटेक कंपन्या क्रेडिट स्कोअरच्या पलीकडे जातात क्रेडिट लाइन (Credit Line) किंवा लाइन ऑफ क्रेडिट (Line of Credit) ऑफर करतात.

क्रेडिट लाइन
क्रेडिट लाइन हे एक लोन प्रोडक्ट आहे जे केवळ पगारदार आणि सेल्फ एम्प्लॉयड लोकांना दिले जाते. जरी त्यांच्याकडे क्रेडिट हिस्ट्री नसेल किंवा क्रेडिटमध्ये पूर्णपणे नवीन आहेत. या क्रेडिट लाईन्स 2 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंत असतात.

क्रेडीट कार्ड
भारतातील सुपर-प्राइम ग्राहकांच्या केवळ अल्प लोकसंख्येसाठी क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. सध्या केवळ 55 मिलियन क्रेडिट कार्डधारक आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या 4 टक्के आहेत. न्यू-एज फिनटेक कंपन्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी क्रेडिट कार्डसारख्या प्रोडक्ट डिजिटल क्रेडिट लाइनचा विस्तार करीत आहेत. क्रेडिट कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो खरेदीसाठी किंवा कॅश अ‍ॅडव्हान्ससाठी वापरलेजाऊ शकते.

तात्पर्य
क्रेडिट लाइन किंवा क्रेडिट कार्ड पर्याय ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असतो. बँक चांगली क्रेडिट हिस्ट्री असलेल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा देतात. उर्वरित ग्राहकांसाठी क्रेडिट लाइनचा एक पर्याय आहे. क्रेडिट लाइनमध्ये ग्राहकांना आवश्यकतेनुसार आणि हवे तेव्हा पैसे मिळू शकतात. क्रेडिट लाइनमधील व्याजाची रक्कम फक्त वापरलेल्या रकमेवरच भरावी लागते. क्रेडिट लाइन ग्राहकांना प्रीपेमेंट पेनल्टी भरावी लागत नाही.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like