India Vs New Zealand:उर्वरित सामना आज खेळला जाणार ; आजही पाऊस आल्यास कोण जाणार फायनलला ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मँचेस्टर | भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्याला पावसाचे ग्रहण लागले हे. काल हा सामना सुरु असतानाच मुसळधार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना थांबवण्यात आला. न्यूझीलंडने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लडने ५ व्हीकेटच्या जोरावर ४६. १ षटकात २११ धावा काढल्या. आता आज इथून पुढे सामना खेळला जाणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी आजचा दिवस देखील खराब हवामानाचा राहणार आहे. कारण मँचेस्टरयेथील हवामान खात्याने आज देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आजचा सामना सुरूच झाला नाही तर भारत गुणसंख्येच्या आधारावर फायनलमध्ये जाण्याची शक्यता आहे. साखळी सामान्यामध्ये भारताने ७ सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने केवळ ५ सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारत थेट फायनलमध्ये जाऊन धडकण्याची शक्यता आहे.

पाऊसजन्य परिस्थिती ओढवल्यास साखळी सामान्यात दोन्ही संघाने केलेली कामगिरी लक्षात घेऊन अंतिम सामन्यात कुणी जायचे याचा निर्णय जाहीर केला जातो. त्यामुळे भारत सध्या गुणसंख्येत प्रथम स्थानी आहे. तर साखळी सामन्यातील भारताची कामगिरी न्यूझीलंडपेक्षा उजवी आहे. त्यामुळे भारतच फायनलमध्ये जाणार हे निश्चित आहे. विशेष बाब म्हणजे साखळी सामन्यात हि भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पावसाने रद्द केला होता.

नवनीत राणांची खासदारकी जाणार?

‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर

विश्वचषकातून भारत बाहेर ; सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक

काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र

राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला

 

Leave a Comment