हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे क्रिकेटमधील दोन दिग्गज क्रिकेटपटू आहेत.पण जेव्हा हे दोघेही क्रिकेटच्या मैदानात उतरत असत तेव्हा त्यांना आउट करताना गोलंदाजांना बरीच कसरत करावी लागत असे.बऱ्याच वेळा, जेव्हा गोलंदाज सर्व प्रयत्न करून कंटाळत,तेव्हा ते फक्त नशिबावरच सोडून डर्ट असत की केव्हा हे एखादी चूक करतील आणि यांच्या विकेट्स मिळतील.ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पी याचेही यांच्याबाबत असेच मत आहे.
गिलेस्पीने म्हटले आहे की क्रिकेटविश्वातील या दोन दिग्ग्ज खेळाडूंना बाद करणे फार कठीण होते. या दरम्यान सचिन-लारापैकी कोणाला बाद करण्यात सर्वात जास्त अडचण यायची हेही त्याने सांगितले.
काउ कॉर्नर क्रॉनिकल्सने गिलेस्पीचा हवाला देत म्हटले आहे की, “हे दोघेही वेगवेगळी शैली असलेले खेळाडू होते आणि दोघंही बाद करणे हे अवघडच होते. पण मला नेहमी वाटते की”सचिनची विकेट घेणे थोडे अवघड होते लाराप्रमाणे तो तुम्हांला फटकावत नसे”.
तो म्हणाला, “हे दोघेही उत्तम खेळाडू आहेत. मला आनंद आहे की मला यापुढे आता या दोघांना गोलंदाजी करावी लागणार नाही. हे दोघेही सर्वोत्कृष्ट ठरले. माझ्यासाठी हा एक सन्मान आहे की मी दोघांनाही गोलंदाजी केलेली आहे. “
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.