हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Cricket New Rules । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) येत्या १ जूनपासून क्रिकेट मध्ये अनेक मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट सामने आणखी रोमांचक व्हावेत, प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता यावा यासाठी आयसीसी सातत्याने नवनवीन बदल करत असतेच. आताही कंकशन सब्स्टिट्यूट, नवीन चेंडू, बॉण्ड्री वरील झेल याबाबत आयसीसीने काही नवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक नियम म्हणजे कंकशन सब्स्टिट्यूट.. आत्तापर्यंत तुम्ही ११ खेळाडूंचा एक संघ बघितला असेल, पण आता आयसीसीने या ११ खेळाडूंसोबत ५ कंकशन सब्स्टिट्यूट खेळाडूंची नावेही जाहीर करण्यास सांगितलं आहे. तसेच गरज पडल्यास हा खेळाडू मैदानातही उतरेल…. हा नियम नेमका कसा आहे? त्याची माहिती आपण जाणून घेऊयात.
११ नव्हे तर १६ खेळाडूंचा संघ? Cricket New Rules
आयसीसीच्या नव्या कंक्शन सबस्टिट्यूट नियमानुसार, (Cricket New Rules) आता दोन्ही संघांना सामना सुरू होण्यापूर्वी त्यांच्या ५ च खेळाडूंची नावे मॅच रेफरीला कंक्शन रिप्लेसमेंटसाठी द्यावी लागतील. यामध्ये एक विकेटकीपर, एक स्पिनर, एक अष्टपैलू, एक फलंदाज आणि एक वेगवान गोलंदाजाचा समावेश असेल. जर एखादा खेळाडू सामन्यादरम्यान कंक्शनमुळे बाहेर पडला तर त्याच्याच बरोबरीचा खेळाडू मैदानात उतरेल. म्हणजेच काय तर एखादा विकेटकिपर कंक्शनमुळे बाहेर पडला तर त्याला रिप्लेस करायला दुसरा खेळाडूही विकेट किपरच हवा.
दुसरा एक नियम आहे तो म्हणजे नव्या चेंडूबाबत, सध्या, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन्ही बाजूनी दोन नवीन चेंडू वापरले जातात. परंतु आता नवीन नियमानुसार, डावातील पहिल्या ३४ षटकांसाठी दोन्ही चेंडू वापरले जातील. त्यानंतर ३५ व्या षटकापासून डावाच्या शेवटपर्यंत दोन्ही संघाकडून फक्त एकच चेंडू वापरला जाईल. ३४ ओव्हर पूर्ण झाल्यानंतर आणि ३५ व्या षटकाच्या सुरुवातीपूर्वी, क्षेत्ररक्षण करणारा संघ त्या दोन चेंडूंपैकी एक निवडेल. जर सामना पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे कमी ओव्हरचा झाला आणि २५ षटकांचा किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर फक्त एकच चेंडू वापरला जाईल. ३४ षटकांनंतर वापरला जाणार नाही तो चेंडू बॅकअप म्हणून ठेवला जाईल. या नव्या नियमामुळे बॉलर्सला शेवटच्या शतकात रिवर्स स्विंग मिळण्यास मदत होईल असं बोललं जातंय.
बाउंड्री लाईनवरील कॅच आणि डीआरएसबाबत सुद्धा बदल होईल
आजकाल फिल्डिंगची क्षमता जबरदस्त वाढली आहे. अनेक अश्यक्यप्राय झेल घेतले जात आहे. खास करून बाऊंड्री लाईन वर असे कॅच घेतले जात आहेत ज्याचा कधी विचारही केला नसेल. परंतु कधी कधी अशा कॅचच्या निर्णयावरून गदारोळ सुद्धा होतो. ज्यामध्ये खेळाडू काही निर्णयांवर नाराज असतात. आता यावर उपाय म्हणूनआयसीसीने सीमारेषेवरील झेल तसेच डीआरएस नियमात (Cricket New Rules) काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची माहिती लवकरच दिली जाईल.