हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उमर अकमलवर ३ वर्षाची बंदी घातली आहे.यावर उमरचा भाऊ कामरान अकमल याने एक मोठे विधान केले आहे.कामरान अकमलने आपल्या भावावर लादलेल्या ३ वर्षाच्या बंदीला कठोर शिक्षा असल्याचे म्हटले आहे आणि त्याचा विश्वास असा आहे की आपला भाऊ या शिक्षेस नक्कीच आव्हान देईल.
पाकिस्तान सुपर लीग दरम्यान उमर अकमल याच्याशी बुकींनी संपर्क साधला होता, त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी त्याच्यावर ३ वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. उमरवर फेब्रुवारी महिन्यात दोन प्रकरणात बोर्डाच्या लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम २.४.४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या निर्णयाने आश्चर्यचकित झालेलला माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान म्हणाला, “उमरला दिलेल्या या शिक्षेमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे. तीन वर्षांची बंदी ही अत्यंत कठोर शिक्षा आहे.तो नक्कीच याविरोधात अपील करेल. “पाकिस्तानकडून ५७ कसोटी,१५३ एकदिवसीय आणि ५८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या कामरानने सांगितले की, इतर खेळाडूंना यापूर्वी अशाच आरोपावरून दिलेली शिक्षा कमी करण्यात आलेली होती.
तो पुढे म्हणाला, “हे निश्चितपणे समजून घेणे आता कठीण आहे कारण पूर्वी इतर खेळाडूंवरही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कमी वेळेसाठी बंदी घातली गेली होती, तर उमरला कठोर शिक्षा देण्यात आली आहे .” कामरानने मोहम्मद इरफान आणि मोहम्मद नवाज यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाई विषयी सांगताना म्हंटले त्यांनी सट्टेबाजांची माहिती न दिल्याबद्दल या दोन्ही खेळाडूंवर अल्प कालावधीसाठी बंदी घातली गेली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.