हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिकेट विश्वचषक (Cricket World Cup 2023) स्पर्धा २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. सलामीवीर रोहित शर्मा यांच्या होतीच कर्णधारपदाची धुरा राहणार असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार असेल. यंदाची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असून क्रिकेट चाहत्यांना संघाकडून मोठया अपेक्षा आहेत.
१५ जणांच्या या चमूत ७ फलंदाज, ३ अष्टपैलू आणि ५ गोलंदाजांचा समावेश आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव श्रेयश अय्यर यांच्यामुळे फलंदाजी मजबूत वाटतं आहे. तर जसप्रीत बुमराह, शमी, सिराज, कुलदीप यांच्यामुळे गोलंदाजीला सुद्धा चांगली धार आली आहे. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या अष्टपैलू खेळांडूंमुळे संघात चांगलाच समतोल साधला गेलाय. त्यामुळे भारताचा संघ हा मजबूत वाटतं आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि विकेटकिपर संजू सॅमसन यांना मात्र भारतीय संघात संधी मिळाली नाही.
🚨 NEWS 🚨
India’s squad for #CWC23 announced 🔽#TeamIndia
— BCCI (@BCCI) September 5, 2023
असा असेल भारतीय संघ – Cricket World Cup 2023)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, कुलदीप यादव
दरम्यान, 5 ऑक्टोबरपासून (Cricket World Cup 2023) एकदिवसीय विश्वचषक 2023 ला सुरू होणार आहे. सलामीचा सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. गेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. यंदाची स्पर्धा भारतात होणार असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो त्यामुळे चाहत्यांना गिफ्ट देण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडू करतील.