मँचेस्टर | भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न आज खऱ्याअर्थाने भंगले असून भारताला न्यूझीलंडने पराभूत केले आहे. कालपडलेल्या पावसाने सामन्याचे चित्र बदलून टाकले. काल ४६.१ षटकावर थांबलेला सामना आज पुढे सुरु झाला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २४० राणांचेलक्ष ठेवले होते. ते लक्ष भारताला गाठता आले नाही शेवटी भारताचा संघ २२१ वर सर्व गडी बाद या स्थितीत जावून पोचला. तेव्हा ४९.३ हे षटक सुरु होते.
भारताचे पट्टीचे फलंदाज तंबूत परतल्याने भारताची विजयाची आशाच मावळली होती. परंतु महेंद्र सिंग धोनी मैदानावर आला आणि त्याने रवींद्र जडेजाच्या मदतीने २४०धावांचे लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला.मात्र विजय समीप असतानाच महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला. त्यामुळे सामन्याचे संपूर्ण चित्रच पालटले. त्यानंतर आलेल्या खेळाडूंनी खेळण्याचा प्रयत्न केला मात्र विजय होऊ शकला नाही. भारत २२१ धावांवर सर्व गडीबाद या स्थितीत जावून पोचला आणि भारताचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आले.
‘या’ कारणांमुळे भारतीय संघ विश्वचषकातून पडला बाहेर
विश्वचषकातून भारत बाहेर ; सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सोळाजण इच्छूक
काँग्रेस नेत्यांकडून आमच्या जीवाला धोका ; आमदारांचे पोलिसांना पत्र
राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी काँग्रेसने आणला नवीन फॉर्मुला