“तुझी उणीव नक्कीच भासेल” ; ‘या’ खेळाडुसाठी रोहित शर्माची भावनिक पोस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतिक क्रिकेट मधील सर्वात मोठी लीग असलेल्या आयपीएल च्या 14 व्या हंगामासाठी लवकरच लिलाव केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सर्व संघांनी आपल्या संघातील करारमुक्त केलेल्या खेळाडूंची नावं BCCIला दिली. त्यात 5 वेळचे चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने दिग्गज खेळाडू लसिथ मलिंगाला करारमुक्त केले. मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने त्याला करारमुक्त करण्यात आले.

दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने भावनिक पोस्ट लिहून मलिंगा बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. “क्रिकेट या खेळाला समृद्ध करणारा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे लसिथ मलिंगा. तू खऱ्या अर्थाने मॅचविनर आहेस. संघातील आणि ड्रेसिंग रूममधील तुझा सहवास आणि वावर आम्ही नक्कीच मिस करू. तुझी उणीव भासेल”, असा संदेश त्याने आपल्या इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिला.

लसीथ मलिंगा हा गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मुंबईचा प्रमुख गोलंदाज म्हणून मलिंगाने दमदार कामगिरी केली आहे. मलिंगा आयपीएल मध्ये 122 सामने खेळला असून त्याने तब्बल 170 बळी मिळवले आहेत. यॉर्कर किंग म्हणून मलिंगा जगभरात ओळखला जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like