IPL मधील ‘हा’ संघ आहे सर्वात वाईट ; युवीचा धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपल्या करिअरमध्ये जबदरदस्त कामगिरी गेली. युवराजनं भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून दिला. 2011मध्ये देशाला वर्ल्ड चॅम्पियन केले. मात्र आयपीएलमध्ये युवीला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. आयपीएलमध्ये युवीने केवळ 24च्या सरासरीनं धावा केल्या.

आयपीएलमध्ये युवीला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याला आयपीएल फ्रंचायझी नाकारत राहिल्या. युवी आतापर्यंत 6 संघाकडून आयपीएल खेळला आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाब, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स, या संघाकडून 12 हंगामात खेळला आहे.परंतु प्रत्येक वेळी युवी अपयशी ठरला.आयपीएल मध्ये युवीची बॅट म्हणावी तशी तळपलीच नाही.

मात्र अशा परिस्थितीतही एक संघ युवीला आवडत नव्हता. युवीनं आपल्या मुलाखतीत स्पर्धेदरम्यान त्याला हा संघ सोडण्याची इच्छा झाली होती, असे सांगितले होते.युवराजनं किंग्ज इलेव्हन पंजाब संघ त्याला आवडत नसल्याचे सांगितले होते. स्पोर्ट्सटाइम 24X7नं याबाबत वृत्त दिले आहे. मुख्य म्हणजे युवी स्वत: या संघाचा कर्णधारही राहिला आहे.युवराज सिंगने सांगितले की, किंग्ज इलेव्हन पंजाब संघातून त्याला पळून जायची इच्छा झाली होती. टीम मॅनेजमेंटला तो आवडत नव्हता. युवी असेही म्हणाला की, मला पंजाबचा संघ आवडतो पण मॅनेजमेंटमध्ये असलेले लोकं चांगले नाहीत.

Leave a Comment