बेकायदा देशी दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शहागाव (ता. कराड) येथील आदित्य परमिट रूम बिअरबार नजीक बेकायदा देशी दारू विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये 33 हजार 696 रुपयांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागेश शिवाप्पा जालवादी (वय 49, रा. मसूर, ता. कराड) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहागाव येथील आदित्य परमिट रूम बिअर बार शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विना परवाना बेकायदा देशी दारू विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या आदेशानुसार पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यामध्ये नागेश शिवाप्पा जालवादी यांच्या कब्जात बेकायदा देशी दारू विक्री करण्याच्या हेतून आढळलेले देशी दारूचे 14 बॉक्स पोलिसांनी हस्तगत केले. त्यामध्ये 33 हजार 696 रुपयांच्या देशी दारूच्या 648 बाटल्या आढळून आल्या.

याप्रकरणी पोलिसांनी संशयित नागेश जालवादी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक एस. डी. शेलार, पोलीस अंमलदार प्रवीण पवार, सागर बर्गे यांचा सहभाग होता.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment