Crime News : भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; महाराष्ट्रात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Crime News । राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीचे सरकार असून राज्याचा कारभार दोन्ही पक्षाकडून व्यवस्थित सुरु आहे. मात्र याच युतीला आता एका घटनेमुळे गालबोट लागलं आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला (Ganpat Gaikwad Firing) आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबीनमध्ये हा गोळीबार झाला आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं – Crime News

याबाबत अधिक माहिती अशी कि, भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात वाद झाला आणि यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये महेश गायकवाड यांना पाच गोळ्या लागल्या आणि राहुल पाटील याना दोन गोळ्या लागल्या . ठाण्यातील जुपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. या गोळीबारानंतर गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी जुपिटर हॉस्पिटल मध्ये जाऊन महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची भेट घेतली आहे. डॉक्टरनी दिलेल्या अपडेटनुसार, महेश गायकवाड यांच्या शरीरातून ६ गोळ्या आणि राहुल पाटील यांच्या शरीरातून २ गोळ्या काढण्यात यश आलं आहे. सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

गोळीबाराचा पश्चाताप नाही – गणपत गायकवाड

मी केलेल्या गुन्ह्याचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. महेश गायकवाड हा माझ्या मुलाच्या अंगावर धावून गेला. पोलीस स्टेशनबाहेरही त्यांनी शेकडो मुलं जमा केली होती. हा सगळा प्रकार मला सहन झाला नाही. त्यामुळे आत्म संरक्षणासाठी मी गोळीबार केला (Crime News) असं गणपत गायकवाड यांनी म्हंटल. तसेच जर माझ्यासमोर माझ्या मुलाला ते हात लावत असतील, तर माझा जगून तरी काय फायदा? असा उलट सवाल गणपत गायकवाड यांनी केला.