सातारा प्रतिनिधी | दीड कोटीच्या विम्यासाठी एका व्यक्तीसह स्विफ्ट गाडी जाळल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. ही धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी सुमित मोरेसह पाच आरोपींना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यातल्या बोधेवाडी घाटात कार आणि मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेत सुमित मोरे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं होतं. मात्र तपासाअंती सुमित मोरेनेच बनाव रचून आपला मित्र तानाजी आवळेची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
दोन दिवसापूर्वी उकिर्डे घाटात पोलिसांना संपूर्ण जळालेली गाडी सापडली होती. या गाडीच्या स्टेअरिंगवर एक मृतदेह देखील पोलिसांना आढळला होता. गाडीच्या चेसीनंबरवरुन गाडीच्या मालकाचा पत्ता मिळाला. त्यानुसार घरातील सर्वांना बोलावून घेतले. याच तपासातून मृतदेहाची ओळख पटली. गाडीने पेट घेतला आणि त्यात गाडीचा चालकाचा मृत्यू झाला अशी नोंद पोलीस ठाण्याच्या डायरीत झाली आहे. त्यानंतर पोस्टमार्टम करुन मृतदेह मोरे कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. या गुन्हयात मुख्य आरोपी सुमित मोरेसह त्याचे कुटुंबीय सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”