पंढरपूरमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळया घालून हत्या; मारेकऱ्याचा शोध सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बापू भागवत यांची आज दुपारी गोळया घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. तोंडाला रूमाल बांधून आलेल्या अज्ञात हल्ले खोरांनी बापू भागवत यांची दिवसा ढवळया गोळया घालून हत्या केली. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या हत्येखोरांचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की विश्वास उर्फ बापू बबन भागवत वय ३५ हे रविवारी दिनांक २६ रोजी दुपारी पंढरपुर सातारा रस्त्यावरील श्री ब्रह्मचैतन्य स्टेशनरी दुकानासमोर बसले होते. तेवढयात मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि ते घटना स्थळावरून फरार झाले. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या काही नागरिकांनी भागवत यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या घटनेचा पंचनामा हल्लेखोरांचा शोध घेणे सुरु केले आहे.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबे ब्रायंटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; कोबेच्या मुलीसह ९ प्रवाशी ठार

बेरोजगारांच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी युवकाचं आवाहन; नागरिकतेबरोबर नोकरीही गरजेचीच

अखेर एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं काढली विक्रीस