श्रीनगर महामार्गावरील चकमकीत ३ दहशतवादी ठार; चकमक अजूनही सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत आतापर्यंत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. आज पहाटेपासून सुरू झालेली ही चकमक अजूनही सुरूच आहे.

पोलिस महानिरीक्षक मुकेश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सीआरपीएफच्या जवानांनी तपासणी करण्यासाठी ट्रक थांबवला होता. या ट्रकमध्ये दहशतवादी लपलेले होते. पोलिसांनी ट्रक अडवताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यावेळी एक जवान जखमी झाला आहे”. प्रत्युतरात करण्यात आलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला तर इतर फरार झाले. यानंतर परिसराला घेराव घालत दहशतवाद्यांचा शोध सुरु करण्यात आला होता.

एकीकडे ही चकमक सुरू असताना, भारतीय लष्कराने परिसराची नाकेबंदी केली असून परिसरात शोध मोहीम हाती घेतली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली आहे.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

तापसी पन्नूच्या ‘थप्पड’ सिनेमाचा पोस्टर रिलीज; प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद

कुणाल कामरा काही अर्णबचा पिच्छा सोडेना!प्रवासबंदीनंतर कामराने केली अर्नबच्या ऑफीसबाहेर

पोस्टरबाजी1965 मध्ये बजाज ग्रुपची धुरा हातात घेतलेले राहुल बजाज आता कंपनीला करणार ‘रामराम’