बंगरुळु | कॅफे कॉफी डे चे संस्थापक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे जावई व्ही.जी. सिद्धार्थ यांनी आपल्या कामगारांच्या नवे लिहलेले पत्र असता समोर आले आहे. त्यांत त्यांनी खूप लढली पण आता थांबतोय असे भावनिक लिखाण केले आहे. हे पत्र मिळाल्या नंतर गायब सिद्धार्थ यांच्याबद्दल उलट सुलट अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
सिद्धार्थ यांनी लिहलेल्या पत्रातून हे उघड झाले आहे की ते आर्थिक पेचात सापडले होते. आर्थिक पेचाच्या तणावातून त्यांनी आपल्या जीवाचे काय बरे वाईट केले का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातो आहे. एका इक्विटी पार्टनर्सचा दबाव मी आणखी सहन करू शकणार नाही. हा पार्टनर मला सतत शेअर बायबॅक करण्यासाठी दबाव टाकत आहे. हे ट्रान्झॅक्शन मी अंशत: सहा महिन्यांपूर्वी एका मित्रासोबत भांडवल उभारण्याच्या उद्देशाने केले होते, असेही सिद्धार्थ यांनी पत्रात नमूद केले आहे. इतरही ऋणदात्यांच्या मोठ्या दबावामुळे शेवटी मला हार पत्करावी लागत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हणले आहे.
तसेच आपल्याला एक माजी आयकर अधिकारी देखील कंपानी बंद पडण्याच्या धमक्या देत होता. याच अधिकाऱ्याने कंपनीच्या भाग भांडवलावर जप्ती आणून कंपनी बंद पडण्याचा देखील प्रयत्न केला असे सिद्धार्थ यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे. शर्थीच्या प्रयत्नानंतर देखील आपल्याला चांगले बिजनेस मॉडेल उभा करता आले नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला. कोणाचे कर्ज बुडवण्याचा माझा कधीच उद्देश नव्हता. तसेच कोणाची फसवणूक करण्याचा देखील माझा उद्देश नव्हता असे सिद्धार्थ यांनी आपल्या पत्रात म्हणले आहे.