कुख्यात बॅग लिफ्टिंग गॅंग गजाआड, औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाची कारवाई

बँकेतून पैसे काढून बाहेर निघणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेऊन त्यांचे लाखो रुपये लंपास करणारी आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतील कुख्यात बॅग लिफ्टिंग गॅंग औरंगाबाद गुन्हेशाखेच्या पथकाने पैठणमधून पकडली आहे. या टोळीने मागील अनेक महिन्यापासून धुमाकूळ घालत पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. शेवटी या टोळीला गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

‘त्या’ १७ वर्षीय मुलीची आत्महत्याच! पोलीस तपासात खुलासा

कोल्हापूर जिल्हयातील कसबा तारळे येथील एका १७ वर्षीय कॉलेज युवतीचा मृतदेह मंदीरात घंटेला बांधलेल्या आढळून आला होता. एक तरुणीचा संशयास्पद मृतदेह सापडल्याने परिसरासह जिह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस चौकशीत मृतक तरुणीचे कौसर नासिर नायकवडी असं असल्याचे कळाले होते. या तरुणीचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला होता त्यानुसार प्रथमदर्शी या तरुणीने स्वतः गळफास लावून घेतल्याची शक्यता वर्तवली जात होती.

पसरणी घाटात शिवशाही बस- ट्रॅव्हल्सचा अपघात,तब्बल ५० प्रवासी जखमी झाल्याची भीती

साताऱ्यामधील वाई आणि महाबळेश्वर मार्गावर असणाऱ्या पसरणी घाटामध्ये शिवशाही बस आणि खासगी ट्रॅव्हल्स चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ४० ते ५० प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे.

अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एसटी चालकाची स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या  

माण तालुक्यातील दहिवडी शहरात दहिवडी एसटी आगारामध्ये चालक म्हणून कार्यरत असणारे काशीनाथ अनंतराव वसव यांनी आज पहाटे माण नदीपात्रा नजीक असणाऱ्या स्मशानभूमीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून या बस चालकाने आत्महत्या केल्याचा बस चालकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

साताऱ्यामध्ये बांधकाम व्यवसायिकाने केली स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

साताऱ्यामध्ये स्वतःवरच गोळी झाडून घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संतोष जयसिंग शिंदे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृत शिंदे हे बांधकाम व्यावसायिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून या घटनेमुळे शिवाजीनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश – सुप्रिया सुळे

मुंबई | हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काउंटर केला. त्यानंतर देशभरात हैदराबाद पोलिसांच्या कृतीचे कौतुक करत अभिनंदन करण्यात आले. मात्र समाजातील काहींनी पोलिसांच्या सदर कृत्याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बलात्कार्‍यांचे एन्काउंटर हे यंत्रणेचे अपयश असल्याचे म्हटले आहे. यावेळी बलात्कार्‍यांना निश्चित वेळेत कठोर शिक्षा होण्यासाठी कडक कायदे करण्याची आवश्यकता … Read more

अशा आरोपींना जर फाशी होत नसेल तर एन्काउंटरच योग्य – अण्णा हजारे

अहमदनगर प्रतिनिधी | देशातील महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटनांत सतत वाढ होत आहे. त्यांचे खटले द्रुतगती न्यायालयात चालूनही आरोपींना फाशीची शिक्षा होत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त करत हैदराबाद पोलिसांच्या कारवाईचे समर्थनही केले. व्हेटरनरी डॉक्टर महिलेवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले … Read more

नित्यानंदचा पासपोर्ट सरकारकडून रद्द, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

वादग्रस्त स्वघोषित स्वामी नित्यानंद याचा पासपोर्ट केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने रद्द केला आहे. तसेच नव्या पासपोर्टसाठी त्याने केलेला अर्जही फेटाळला आहे. नित्यानंदला आश्रय दिल्याचा इन्कार इक्वेडोरच्या सरकारनेही केला आहे.

बेकायदेशीर दारू विक्रेत्याला खटावमध्ये अटक, तब्बल पावणे ५ लाखाचा मुद्देमाल जप्त

खटाव तालुक्यातील एनकुळ येथे बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्री सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नामदेव खरमाटे या इसमाकडून गेली अनेक महिने हा व्यवसाय सुरु होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धड टाकली असता त्यांना मिळालेल्या माहितीत तथ्य आढळून आलं. पंचक्रोशीतील गावांना छुप्या पद्धतीनं दारू पुरवठा करण्याचं काम खरमाटे करत होता. नामदेव बाबा खरमाटे यांच्यावर वडुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मारलेल्या छाप्यात देशी विदेशी असा एकूण ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्टेट बँकेच्या एटीएमला आग लावल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून खुलासा

रभणी येथे दोन दिवसापूर्वी राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएमला आग लागल्याची घटना घडली होती. ही आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे या प्रकरणांमध्ये आता नवीन खुलासा झाला असून या खुलाशाने जिल्हाभर खळबळ उडाली आहे.