सांगलीच्या जिल्हा कारागृहात कैद्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । सांगली जिल्हा कारागृहातील बराक नं-१ समोरील स्वच्छतागृहात अब्दुलमोमीन वाहिदखान पठाण या कैद्याने खिडकीला फाटक्या टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पठाण हा खुनाच्या गुन्ह्यात गेल्या काही वर्षांपासून सांगली कारागृहात आहे. त्याच्यावर न्यायालयात खटला सुरु आहे.

२७ जानेवारी रोजी मध्यरात्री पठाण याने लघुशंकेस जाण्याचा बहाणा केला. स्वच्छतागृहात जाऊन त्याने स्वच्छतागृहाच्या खिडकीला असलेली बारीक जाळी तोडून लोखंडी गजाला स्वतःच्या टॉवेलच्या फाटलेल्या तुकड्याचे साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेथे तैनात असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी तात्काळ तेथे धाव घेत पाठांची सुटका केली, आणि उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

उपचारानंतर त्याची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. याप्रकरणी सुरक्षारक्षक सुरेश कांबळीकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अब्दुलमोमीन पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

1 लाखाची लाच घेताना नायब तहसीलदार जाळ्यात

अर्णब गोस्वामीला विमानत केलेल्या शाब्दिक शेरेबाजीमुळे कुणाल कामरावर ६ महिने विमानप्रवास बंदी

प्रशांत किशोर हा जदयुतील कोरोना व्हायरस; बदलत्या भूमिकांवरुन अजय आलोक यांचं टीकास्त्र