भामटेगिरीचा कहर!! Amazon वरुन मागवले कलर प्रिंटर….अन् घरातच बनवत होता बनावट नोटा

fake notes
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अॅमेझान वरुन वस्तु खरेदी करण्याचा तरूणाईला अधिक आवड जडलेली असते. कोण काय मागवेल याचा काय नेम नसतो.माढा तालुक्यातील दारफळ (सिना) गावात वास्तव्यास असलेल्या एका तरुणाने अॅमेझान वरुन कलर प्रिंटर मागवले आणि नामी शक्कल लढवत प्रिंटर आणि a4 पेपर च्या सहाय्याने बनावट नोटा बनवण्याचा जणु उद्योगच घरी सुरु केला होता.

हा कारनामा करणारा सिद्धेश्वर कैंचें आता पोलिसांच्या हाती देखील लागला आहे.त्यांचा साथीदार असलेल्या धनाजी पाटलोबा दाडे रा.वाफळे यास देखील ताब्यात देखील घेतले गेले.दोघांची ही रवानगी आता पोलिस कोठडीत करण्यात आलीय. सिद्धेश्वर राहत असलेल्या दारफळ गावातुन त्यांच्या घरातून टेभुर्णी पोलिसांनी १० हजार किंमतीचा प्रिंटर तसेच पोलिसांनी सिद्धेश्वर ला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून ५०० आणी २ हजारांच्या ६७ हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्यात.

त्याच झालं असं की सिद्धेश्वर हा धनाजी दाडे यास टमटम सोबत घेऊन मोडनिंब च्या जनावरांच्या बाजारात शेळ्या खरेदीस गेला होता.शेतकरी कुंडलिक यमनाथ लेंगरे रा.पोखरापुर यांच्याकडून सिद्धेश्वर ने ८ शेळ्या खरेदी केल्या.५ हजार रुपय प्रती शेळी प्रमाणे ४० हजाराला व्यवहार ही ठरला.सिद्धेश्वर ने दिलेल्या नोटा ची शेतकरी लैंगरे यांना शंका आली.त्यांनी दुसर्या नोटांची सिद्धेश्वर कडे मागणी केली.

मात्र सिद्धेश्वर ने याच नोटा माझ्याकडे आहेत मी आताच एटीएम मधुन काढुन आणलेत.अशी बतावणी ही मारली मात्र शेतकर्याने दुसर्या नोटा चा हट्ट धरला.मग तिथुन सिद्धेश्वर ने पळ काढला.बाजारात असलेल्या शेतकरी अन् पोलिसांनी पाठलाग केल्यानंतर सिद्धेश्वर हाती लागला. टमटम मध्ये शेळ्या घेऊन गेलेल्या धनाजी दाडे ही कुर्डूवाडीतुन अटक केले आहे.आणी पोलिसांना त्यांने बनावट नोटा असल्याची कबुली देखील दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’