व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ख्रिस्तियानो रोनाल्डो बनला 800 गोल करणारा पहिला खेळाडू, कोणत्या संघासाठी सर्वाधिक गोल केले हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. 800 गोल करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला. मँचेस्टर युनायटेडचा स्ट्रायकर रोनाल्डोने आर्सेनलविरुद्ध 2 गोल करत ही कामगिरी केली. आता त्याचे 801 गोल झाले आहेत. गुरुवारी झालेल्या या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने आर्सेनलचा 3-2 असा पराभव केला. रोनाल्डोने 52 व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे सामन्यातील पहिला आणि 70 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. यासह त्याचा गोल आकडा 801 झाला. ब्राझीलचा दिग्गज खेळाडू पेलेने 1000 हून जास्त गोल केल्याचा दावाही केला जातो. मात्र, याबाबत अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

रोनाल्डोने आपल्या 801 गोलपैकी 130 गोल मँचेस्टर युनायटेडसाठी केले आहेत. तो दुसऱ्यांदा या क्लबकडून खेळत आहे. त्याने रियल माद्रिदसाठी 450 गोल केले आहेत. या स्ट्रायकरने युव्हेंटससाठी 101 गोल केले आहेत. रोनाल्डोने पोर्तुगालकडून खेळताना 115 गोल केले आहेत. स्पोर्टिंग लिस्बनसाठी त्याने 5 गोल केले आहेत.

रोनाल्डो हा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू आहे. त्याने अलीकडेच इराणच्या अली देईचा 109 गोलचा विक्रम मोडला. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर 184 सामन्यांत 115 गोल केले आहेत. सध्या ऍक्टिव्ह असलेल्या फुटबॉल खेळाडूंमध्ये लिओनेल मेस्सी आणि भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री यांच्या नावे 80 गोल आहेत.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, रोनाल्डो फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर 50 कोटी फॉलोअर्स गाठणारा जगातील पहिला व्यक्ती बनला.

मार्च 2021 मध्ये, रोनाल्डोने एकूण गोलच्या बाबतीत ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेलेला मागे टाकले. त्यानंतर इटालियन लीग सेरी-ए मध्ये जुव्हेंटसकडून खेळताना त्याने कॅग्लियारीविरुद्ध हॅट्ट्रिक केली. पेलेच्या अधिकृत अकाउंटनुसार, त्यांनी 767 गोल केले. रोनाल्डोने जानेवारीत पेलेचा विक्रम मोडला. त्यानंतर पेलेच्या अधिकृत खात्यावर 757 गोल लिहिले होते. रोनाल्डो पुढे जाताच पेलेचा विक्रमही बदलला गेला. त्यांचे गोल वाढवले गेले. कॅग्लियारीविरुद्ध हॅट्ट्रिक पूर्ण केल्यानंतर रोनाल्डो म्हणाला -“मी पेलेचा 767 गोलचा विक्रम मोडण्याची वाट पाहत होतो. म्हणूनच गप्प होतो.”

सर्वाधिक 184 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोनाल्डो हा युरोपियन खेळाडू आहे. त्याने पाच वेळा फुटबॉलमधील प्रतिष्ठेचा Ballon d’Or अवॉर्ड जिंकला आहे. मात्र अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीने हा अवॉर्ड 7 पेक्षा जास्त वेळा जिंकला आहे. नुकताच मेस्सीने विक्रमी सातव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.

रोनाल्डोने 2002 मध्ये स्पोर्टिंग लिस्बनमधून आपल्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीला सुरुवात केली. इंग्लिश फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने त्याला 2003 मध्ये यूएस $ 1.7 कोटींमध्ये साइन केले, त्यावेळी तो फक्त 18 वर्षांचा होता. रोनाल्डोने या क्लबसोबत त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये 6 सीजन घालवले. यादरम्यान त्याने 292 सामन्यांमध्ये एकूण 118 गोल केले. त्यानंतर तो रिअल माद्रिदला गेला. त्याने 2018 मध्ये जुव्हेंटससोबत $34 कोटी (रु. 2588 कोटी) चा करार केला होता.

रिअल माद्रिदसह 9 सीजनमध्ये रोनाल्डोने 438 सामन्यांमध्ये एकूण 450 गोल केले आणि तो क्लबचा ऑल टाइम टॉप गोल स्कोरर खेळाडू बनला.