टेंभू येथे कृष्णा नदीत मगरीचे दर्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

तालुक्यातील टेंभू येथील कृष्णा नदीच्या पात्रात स्थानिकांना मगरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी नदीकाठावर जाताना दक्षता घ्यावी, नदीकाठी जाण्याचे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.

टेंभू येथील कृष्णा नदीच्या पात्रात काही ग्रामस्थांना मगरीचे दर्शन झाले. त्यामधील काही ग्रामस्थांनी मोबाईलमध्ये मगरीचे चित्रीकरण केले. हा व्हिडीओ टेंभू परिसरात व्हायरल झाला. मगरचे वास्तव्य नदीपात्रात असल्याचे समजल्यानंतर या परिसरात घबराट पसरली.

गेल्या काही दिवसापासून कृष्णा- कोयना नदीपात्रात मगरीचे वास्तव्य आढळून मोठ्या प्रमाणात येवू लागले आहे. मगरीच्या दर्शनाने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांनी नदीपात्राकडे जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment