कृष्णा कोयनेतल्या मगरींच्या बंदोबस्तासाठी आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 
कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी मगरींचा तातडीने बंदोबस्त करावा या मागणीसाठी जनता संघर्ष दलाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.सांगली जिल्ह्यातील कृष्णा-वारणा नदीकाठच्या भिलवडी, अंकलखोप, ब्रह्मनाळ, तुंग, कसबे डिग्रज, औंदुबर या ठिकाणी मगरींचा वावर वाढत चालला आहे.
आजपर्यंत नऊ जणांना मगरीच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला. तसेच शेळ्या, मेंढ्या, म्हशी आणि कुत्र्यांवर देखील मगरीनी हल्ला केला आहे. कृष्णा-वारणा नदीपात्रात सुमारे चाळीस मगरी असल्याचा अंदाज आहे. मगरींकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी कोणतीही अद्ययावत यंत्रणा वनविभागाकडे नाही.
मगरींचा अधिवास सुरक्षीत कसा राहिल व नदीकाठावरील नागरिकांचे जीवन भितीमुक्त कसे होईल या दृष्टीकोनातून वनविभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रशासनाने लक्ष घालून तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आंदोलनकर्त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.
2 Attachments

Leave a Comment