औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण जोरात वाढत असताना नागरिकांचा गाफीलपणा चव्हाट्यावर येत आहे. जिल्हा प्रशासनाने आठवडाभर जाधव मंडई बंद ठेवली होती, आठवड्याभरानंतर आज ही भाजी मंडई सुरू झाली मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे नागरिकांच्या बेजबाबदारपणातून तीन-तेरा वाजले असल्याचे दिसून आले आहेत.
शहरातील जाधवमंडईत आज सकाळपासूनच कधी न बघितलेला भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली यावेळेस सोशल डिस्टंसिंग चा पुरता बोजवारा उडाला. या घटनेतून औरंगाबादकरांची बेजबाबदार वृत्तीच कोरॊणा संक्रमण वाढवण्यास जबाबदार ठरत असल्याचं अधोरेखीत होत आहे. आपणच कडक लॉकडाऊन लावण्यासाठी प्रशासनाला भाग पडतोय असा प्रश्न जरी उपस्थित केला तरी वावगे ठरणार नाही.
प्रशासन वारंवार डिस्टन्सिंग पाळा, तोंडाला रूमाल वा मास्क वापरा, असे प्रबोधन व जागृती शहरात करत आहेत. शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क आवश्यक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही निघालेले आहेत, मात्र अजूनही शहरवासीय गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. अनेकदा समज देऊनही लोक घराबाहेर पडायचे थांबत नाहीत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group