औरंगाबाद – जिल्ह्यात सर्वत्र अंशत: संचारबंदी लागू असताना औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विक्रेत्यांची आणि खरेदीदारांची मोठी गर्दी आज सकाळपासून उसळली होती. मोठ्या संख्येने झालेली गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बाजार समितीकडून कोणतीही तसदी घेण्यात आली नाही. शहरात सध्या कोरोना विषाणूने प्रचंड थैमान घातले आहे. आजच्या ताज्या आकडेवारीनुसार शहरातील संख्या हजारो पार गेली आहे. तर कोरोना बाधित 1419 रुग्णाचा मृत्यूही झाला आहे.
असे असताना अंशत: संचारबंदी काळात बाजार समितीमध्ये अनावश्याक्क गर्दी का असा सवाल याठिकाणी उपस्थित होत आहे. संचार बंदी लागू करत असताना राज्यात भाजीपाला, किराणा, वैद्यकीय सेवांना सूट देण्यात आली आहे. मात्र जीवाची पर्वा न करता अनेकांनी बाजार समितीमध्ये अनावश्यक गर्दी केली जात आहे.
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी शेकडो गाड्या दाखल होतात मात्र शासनाच्या आदेशाला या ठिकाणी हरताळ फसल्या जातो. शनिवारी आणि रविवारी कडक संचारबंदी असल्याने आज सोमवारी या संचारबंदीला सूट मिळाली असल्याने आपल्याला भाजीपाला मिळेल कि नाही या धास्तीने अनेकांनी जास्तीचा भाजीपाला खरेदी केला. त्यामुळे गर्दीत अधिकच भर पडली. असे असले तरीही बाजार समितीकडून ही गर्दी कमी करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही हे विशेष.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group