सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांब गावचे सुपुत्र CRPF चे जवान विजय सुदाम शिंदे यांना वयाच्या 39 व्या वर्षी वीरमरण आले. नांदेडमधील हैदराबाद येथील रुग्णालयात अल्प आजारावर उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
जांब गावचे सुपुत्र असलेले जवान विजय शिंदे यांचे वडील सुदाम शिंदे हे भारतीय सैन्यात होते. त्यामुळे विजय शिंदे यांच्या संपूर्ण कुटुंबाला देश सेवेचा वारसा आहे. देशसेवेचे धडे घरातूनच गिरवलेल्या वीर जवान विजय यांच्या जाण्याने वाईसह जांब गावात शोककळा पसरली आहे.
काल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर जवान शिंदे यांना आज जांब येथे आणण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास शासकीय इमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.