CRPF मध्ये लाखो पदांची मेगाभरती; 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी

CRPF Recruitment 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरीची इच्छा मनात बाळगून असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस दलात देशातील (CRPF Recruitment 2023) सर्वात मोठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल सव्वा लाखाहून अधिक पदे भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत 4667 महिलांची आणि 1,25,262 पुरुषांची पदे भरली जाणार आहेत. या पदभरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

एकूण पदसंख्या – 1,29,929 पदे

महिला – 4667 पदे
पुरुष – 1,25,262 पदे

भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

नोकरी प्रकार– सरकारी

पगार किती मिळणार –  21,700/- ते 69,100/- रुपये दरमहा  पगार मिळणार आहे.

वय मर्यादा –
1. 18 ते 23 वर्षे
2. SC आणि ST वर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
3. ओबीसी उमेदवारांच्या वयोमर्यादेत तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

सदर उमेदवार १० वी पास असावा किंवा त्या समकक्ष त्याची शैक्षणिक पात्रता असायला हवी.

निवड प्रक्रिया –
1. फिजिकल आणि मेडिकल टेस्ट
2. फिजिकल एफिसेन्सी टेस्ट
3. लेखी परीक्षा (CRPF Recruitment 2023)

अग्नीवीरांनाही मिळणार संधी –

या भरतीसाठी माजी अग्नीवीर जर नोकरीसाठी अर्ज करत असतील तर त्यांना शारीरिक पात्रता चाचणीला सामोरे जावं लागणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच केंद्रातील रिक्त पदे भरणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसेच या पदांच्या नियुक्तीच्या नोटिफिकेशन काढणार असल्याचंही सांगितलं होतं. त्यानुसारच CRPFच्या भरतीची नोटिफिकेशन काढण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी PDF

अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – crpf.gov.in