चीनमध्ये क्रिप्टोकरन्सी मायनिंगवर बंदी, क्रिप्टोकरन्सी मार्केट कोसळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बिटकॉईनसह सर्व व्हर्चुअल करन्सीच्या व्यापाराच्या नावाखाली बेकायदेशीर कामे बंद करण्याचे चीनने म्हटले आहे. तसेच क्रिप्टोकरन्सी मायनिंगवर देखील बंदी घालण्याचा आदेश जारी करणार असल्याचे सांगितले. यासह, शुक्रवारी बिटकॉइनसह सर्व प्रमुख क्रिप्टोकरन्सी मोठ्या प्रमाणात घसरल्या.

चीनचा असा विश्वास आहे की, या व्हर्चुअल करन्सीमुळे आर्थिक संकट येऊ शकते, त्यामुळे त्यांच्याशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी बंदी आवश्यक आहे. चीनच्या सेंट्रल बँकेच्या नेतृत्वाखालील अनेक उच्च सरकारी संस्थांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे की,” ते क्रिप्टोकरन्सीमध्ये सट्टा ट्रेडिंगवर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्यासाठी एकत्र काम करतील.”

पीपल्स बँक ऑफ चायना (PBOC) ने म्हटले आहे की,”क्रिप्टोकरन्सीला पारंपारिक करन्सीप्रमाणे बाजारात फिरण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. PBOC ने सर्व वित्तीय संस्था, पेमेंट कंपन्या आणि इंटरनेट कंपन्यांना क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगशी संबंधित सुविधा पुरवण्यास बंदी घातली आहे.”

क्रिप्टोकरन्सीसह सर्व करन्सीज क्रॅश झाल्या
क्रिप्टोकरन्सी मायनिंगवरील क्रॅकडाउनची बातमी समोर आल्याने क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. Bitcoin ची किंमत 3.86 टक्क्यांनी घसरून $ 32,95,625 डॉलर्सपर्यंत पोहोचली. त्याचप्रमाणे, जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी Ether ची किंमत 6.96 टक्क्यांनी घसरली.

Leave a Comment