नवी दिल्ली । आज, शुक्रवार 15 एप्रिल, सकाळी 9:45 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केट 2.01% खाली आहे. ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप पुन्हा एकदा $1.88 ट्रिलियनवर आला आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सी खाली आल्या आहेत. Bitcoin ची किंमत सध्या 40 हजार डॉलरच्या वर असली तरी XRP आणि Dogecoin ने गेल्या 24 तासांमध्ये अपट्रेंड पाहिले आहे.
Coinmarketcap च्या डेटानुसार, शुक्रवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 2.90% खाली येऊन $40,195.32 वर ट्रेड करत आहे. Ethereum ची किंमत आज गेल्या 24 तासांमध्ये 2.51% घसरून $3,042.49 वर आली आहे. बातमी लिहिण्याच्या वेळी Bitcoin चे मार्केट वर्चस्व 40.7% आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 19.5% आहे.
कोणत्या कॉईन्स मध्ये किती बदल झालेत ?
– XRP – किंमत: $0.7883, वाढ (24 तासात): +6.59%
– Dogecoin – DOGE – किंमत: $0.1437, वाढ (24 तासात): +1.57%
-Terra – LUNA – किंमत: $82.47, घसरण (24 तासात): -6.80%
– Solana – SOL – किंमत: $102.29, घसरण (24 तासात): -3.83%
– Avalanche – किंमत: $78.42, घसरण (24 तासात): -3.79%
– Cardano – ADA – किंमत: $0.9525, घसरण (24 तासात): -2.49%
– Shiba Inu- किंमत: $0.00002224 घसरण (24 तासात): -1.90%
– BNB – किंमत: $418.04, घसरण (24 तासात): -1.10%
सर्वाधिक वाढ झालेले कॉईन्स
Mercenary (MGOLD), CyborgShiba (CBS) आणि MetaPay हे गेल्या 24 तासांत टॉप जंपर्समध्ये होते. Mercenary (MGOLD) गेल्या 24 तासात 925.97% वाढला आहे. CyborgShiba (CBS) हे दुसरे सर्वात मोठे वाढणारे चलन आहे. यामध्ये 665.36% वाढ झाली आहे. MetaPay तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यामध्ये 252.49% वाढ झाली आहे.