रिटायरमेंट नंतर 50 हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी अशा प्रकारे करा गुंतवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नोकरदार लोकांना रिटायरमेंट नंतरच्या आयुष्याची जास्त काळजी असते. विशेषत: खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना रिटायरमेंट नंतर आपला खर्च कसा निघणार याचीच जास्त चिंता असते. तुम्हीही खाजगी कंपनीत काम करत असाल आणि रिटायरमेंट नंतर आर्थिक संकटातून जाण्याची इच्छा नसेल तर आतापासूनच पेन्शनसाठी गुंतवणूक सुरू करा.

यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. याद्वारे गुंतवणूक करून, तुम्ही रिटायरमेंट साठी एक मोठा फंड बनवू शकता जेणेकरून पेन्शन नियमितपणे येत राहील. येथे आम्ही तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहिती देत ​​आहोत.

नोकरीच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक करा
नोकरी सुरू केल्यापासून रिटायरमेंटचे प्लॅनिंगही केले पाहिजे जेणेकरून त्या वेळी जास्तीत जास्त पेन्शन मिळू शकेल. जर एखाद्याने वयाच्या 21 व्या वर्षापासून NPS मध्ये दर महिन्याला 4,500 रुपये गुंतवले, तर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत तो 39 वर्षांसाठी गुंतवणूक करेल. म्हणजेच 54,000 रुपये वार्षिक दराने, 39 वर्षांमध्ये त्यांची गुंतवणूक 21.06 लाख रुपये होईल. NPS मध्ये सरासरी 10 टक्के रिटर्न दिल्यास, मॅच्युरिटीवर त्याला 2.59 कोटी रुपये मिळतील. त्यानुसार वयाच्या 60 व्या वर्षी रिटायर झाल्यावर दरमहा 51,848 रुपये पेन्शन मिळेल. हे कॅल्क्युलेशन अंदाजानुसार करण्यात आले आहे. तसे, NPS मध्ये सरासरी 8 ते 12 टक्के रिटर्न मिळतो.

एन्युइटी किती घ्यायची ?
NPS मध्ये, जर तुम्ही 40 टक्के एन्युइटी घेतली आणि वार्षिक दर 6 टक्के असेल, तर रिटायरमेंट नंतर तुम्हाला एकरकमी 1.56 कोटी रुपये मिळतील. उर्वरित 1.04 कोटी रुपये एन्युइटीकडे जातील. या एन्युइटीमधून दरमहापेन्शन दिली जाईल. एन्युइटीची रक्कम जितकी जास्त असेल तितकी पेन्शन जास्त असेल.

NPS खाते कसे उघडायचे ?
तुम्ही NPS खाते ऑनलाइन उघडू शकता. यासाठी http://Enps.nsdl.com/eNPS किंवा http://Nps.karvy.com उघडा.
एकदा पेज उघडल्यानंतर, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि आपल्या मोबाइल नंबरसह सर्व डिटेल्स भरा.
आता तुमचा मोबाईल नंबर OTP द्वारे व्हेरिफाय केला जाईल. त्यानंतर बँक खात्याचे डिटेल्स भरा.
तुमचा पोर्टफोलिओ आणि फंड निवडा.
विनंती केलेली माहिती भरा.
तुम्ही ज्या बँक खात्याचे डिटेल्स भरले आहे त्याचा कॅन्सल चेक, तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करावी लागेल.
यानंतर NPS मध्ये तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करा.
पेमेंट केल्यानंतर, तुमचा पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर जनरेट केला जाईल. पेमेंट रिसीट देखील उपलब्ध असेल.

गुंतवणूक केल्यानंतर, e-sign/print registration form पेज वर जा. येथे तुम्ही पॅन आणि नेटबँकिंगमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. यासह तुमचे KYC केले जाईल. रजिस्ट्रेशन करताना हे लक्षात ठेवा की तुम्ही बँक खात्यात दिलेले डिटेल्स त्याच्याशी जुळले पाहिजे.

22 बँका सध्या ऑनलाइन NPS ची सुविधा देत आहेत. त्यांची संपूर्ण माहिती NSDL च्या वेबसाईटवर मिळेल.

Leave a Comment