नवी दिल्ली । जगभरातील शेअर बाजारासोबतच क्रिप्टोकरन्सी मार्केटची स्थिती देखील बिकट बनली आहे. रशिया-युक्रेन संकटामुळे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून येत आहे. बिटकॉइन गेल्या 24 तासांत 3.1% घसरून 38,508 डॉलर्सवर आला आहे. ग्लोबल क्रिप्टो करन्सी मार्केट कॅप गेल्या 24 तासांमध्ये 3.2% ने घसरून $1.82 ट्रिलियन झाली आहे.
गेल्या 24 तासांत इथेरियम 4.1% घसरून $2,706.81 वर आला आहे. त्याच वेळी, सोलाना $ 87.21 वर ट्रेड करत आहे, जो 7% खाली आला आहे. मात्र, रविवारी सकाळी त्यात किंचित वाढ झाली आहे.
Dogecoin 3 टक्क्यांनी घसरला
पोल्काडॉट 2% घसरून $17.65 वर आला आहे तर Dogecoin 3.4% घसरून $0.125384 वर आले आहे. मात्र, रविवारी सकाळी Dogecoin नेही वेग पकडला आहे. शिबा इनू गेल्या 24 तासांत 6.3% घसरून $0.00002381 वर आला. मात्र रविवारी सकाळी तो 0.4% वाढला आहे.
युक्रेन क्रिप्टोमध्ये घेत आहे डोनेशन
हे लक्षात घ्या की, युक्रेनियन अधिकारी थेट क्रिप्टोमध्ये डोनेशन घेत आहेत. युक्रेनियन नेत्यांनी क्राउडफंडिंगद्वारे 50 लाख डॉलर्स उभे केले आहेत. यामध्ये बिटकॉइन आणि इथरसह इतर टोकनद्वारे फंड उभारण्यात आला आहे.
युक्रेनचे अधिकृत ट्विटर हँडल आणि देशाचे उपाध्यक्ष मिखाइलो फेडोरोव्ह यांनी शनिवारी डोनेशन साठी क्रिप्टो वॉलेटचे डिटेल्स शेअर केले. या डिटेल्सवर, 100 हून जास्त लोकांनी 30 लाख डॉलर्स डोनेशन दिले.
मार्केट एक्सपर्टच्या मते, शुक्रवारी बाजारात दिसून आलेला पुलबॅक हे चांगले लक्षण आहे, मात्र निफ्टीला 16700-16800 च्या पुढे एक मोठा अडथळा आहे. जर निफ्टी या पातळीच्या वर राहिला तरच अल्पावधीत आणखी वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे, निफ्टीला 16500 वर तात्काळ सपोर्ट आहे, जर हा सपोर्ट तुटला तर आणखी घसरण होऊ शकते.