नवी दिल्ली । आज, 4 फेब्रुवारी, 2022 रोजी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी घसरण झाली. ग्लोबल क्रिप्टोकरन्सीची मार्केट कॅप 4.44% घसरून $1.63 ट्रिलियनवर आली. मार्केट कॅप कमी झाली असली तरीही शुक्रवारी बिटकॉइन आणि इथेरियममध्ये लक्षणीय वाढ झाली होती. दुपारी 2.55 वाजता ही परिस्थिती होती.
गेल्या 24 तासांमध्ये सर्वात जास्त वाढ झालेल्या करन्सीबद्दल बोलायचे झाले तर इथेरियम 6.41% आणि सोलाना 8% च्या वाढीसह अव्व्ल स्थानी आहेत. या दोघांव्यतिरिक्त, Terra – LUNA, Avalanche – AVAX, आणि Polkadot ने देखील लक्षणीय वाढ नोंदवली आहे.
एका आठवड्यात इथेरियममध्ये 17% वाढ झाली
बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 2.62% च्या वाढीसह $37,968.55 वर ट्रेड करत होता. एका आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, बिटकॉइनच्या किंमतीत 3.39% ने वाढ झाली आहे. इथेरियम 6.41% वाढीसह हे कॉईन $2,830.85 वर ट्रेड करत होते. एका आठवड्यात इथेरियम 17.70% वाढला आहे. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.7 टक्के आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.4 टक्के आहे.
24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीज
हे लिहिताना, Qrkita Token (QRT), Bird Token (BIRD) आणि Dogecolony (DOGECO) ही गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीज होत्या. Qrkita Token (QRT) ने गेल्या 24 तासांमध्ये 480.52% वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर Bird Token (BIRD) ने याच कालावधीत 471.39% ची वाढ नोंदवली आहे. याशिवाय Dogecolony (DOGECO) मध्येही 448.64% वाढ झाली आहे.