व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उस्मानाबादच्या खेळाडूसाठी 3 संघात चुरस; अखेर चेन्नईने मारली बाजी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया सुरू असून आजच्या दुसऱ्या दिवशी अनेक खेळाडूंना लॉटरी लागली. त्यातच उस्मानाबाद चा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर याला आपल्या संघात घेण्यासाठी 3 संघात जोरदार चुरस रंगली होती. अखेर त्यात चेन्नई सुपर किंग्स ने बाजी मारत त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं.

राजवर्धन हंगरगेकरसाठी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये चढाओढ सुरू होती. अखेर चेन्नईने या बिडींग वॉरमध्ये बाजी मारली. चेन्नई ने राजवर्धन ला 1.50 कोटींना घेतले. विशेष म्हणजे राजवर्धनची बेस प्राईझ फक्त 20 लाख होती. यंदाच्या आयपीएल मध्ये राजवर्धन पिवळ्या जर्सी मध्ये दिसेल.

कोण आहे राजवर्धन हंगरगेकर-

राजवर्धन हंगरगेकर हा मूळचा उस्मानाबादचा खेळाडू आहे. राजवर्धन अष्टपैलू खेळाडू आहे. यावर्षी वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्यात राजवर्धन हंगरगेकरचा मोलाचा वाटा होता. राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज असून उच्च क्रमवारीत धावा काढण्यासाठी ओळखला जातो.