चाहत्याने विचारलं आपला उपकर्णधार कोण ??CSK ने दिलं हटके स्टाईल उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने घरगुती कारणास्तव आयपीएल2020 मधून अचानक माघार घेतली असून चेन्नई सुपर किंग्स साठी हा सर्वात मोठा धक्का आहे. रैनाच्या माघारीमागे धोनी आणि त्याच्यातील वाद कारणीभूत असल्याचे CSKचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. नंतर त्यांनीच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर अखेर रैनाने स्वत: मुलाखत देत CSKशी कोणताही वाद नसल्याचं सांगितलं. पण त्याचसोबत घर आणि कुटंबीयांना माझी गरज असल्याचेही सांगितलं. अशा परिस्थितीत रैना CSKच्या संघासोबत या हंगामात खेळेल की नाही याबाबत थोडी शंकाच आहे.

सुरेश रैना हा चेन्नई संघाचा आधारस्तंभ आहे. आयपीएलच्या सुरुवातीपासून रैना चेन्नईच्या सोबत आहे. त्याने चेन्नईला अनेक सामने एकहाती जिंकवून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे तो चेन्नई संघाचा उपकर्णधार होता. त्यामुळे त्याच्या माघारीमुळे आता चेन्नईसमोर उपकर्णधारपदाचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. पण चाहत्यांना मात्र नवा उपकर्णधार कोण असेल? याचा CSK पत्ता लागू देत नाहीये. नुकताच एका चाहत्याने ट्विटरवरून यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर CSKच्या अधिकृत अकाऊंटवरून हटके स्टाईल उत्तर देण्यात आले आहे.

एका ट्विटर युजरने CSKला टॅग करत प्रश्न केला की आता आपला उपकर्णधार कोण असणार आहे? त्यावर CSKकडून अतिशय भन्नाट असं उत्तर देण्यात आलं. “Wise captain irukke bayam yen? म्हणजेच आपल्याकडे हुशार कर्णधार असताना घाबरायचं कशाला?”, असं उत्तर CSKने दिलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment